Header Ads

PopAds.net - The Best Popunder Adnetwork

मराठी कथा - रस्त्यावरची स्ट्रॉबेरी


     मी कोल्हापुरुन पुण्याला जाण्यासाठी सकाळी लवकर बाहेर पडलो, सोबत माझी पत्नी आणि पाच वर्षांचा भाचा होता, त्याला पुण्यात बहिणीच्या घरी पोहोचवायचं होतं. रविवार असल्यानं फारशी वाहनं रस्त्यावर दिसत नव्हती आणि आम्हालाही सुट्टी असल्यानं गडबड नव्हती. प्रवास सुरु झाल्यापासून त्याची अखंड वटवट सुरु होती, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणाऱ्या जवळ जवळ प्रत्येक गोष्टीत त्याला स्वारस्य वाटत होतं आणि आम्हालाही तसंच वाटावं या साठी त्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरु होते.

      साताऱ्याच्या पुढं आल्यानंतर एका टोलनाक्यावर आम्ही थांबलो. लगेच गाडीभोवती तिखटमीठ लावलेल्या काकड्या, पाण्याच्या बाटल्या, स्ट्रॉबेरी इत्यादी विकणाऱ्यांचा गराडा पडला.

"मामा, स्ट्रॉबेरी बघ !" जसं काही मला एक फुटापेक्षा जास्त अंतरावर असलेल्या गोष्टी दिसतच नव्हत्या.

"हो बघितली मी !" पण हे वाक्य पूर्ण होईपर्यंत तो खिडकीतून अर्धा बाहेर गेला होता. स्ट्रॉबेरी वाल्याने हि संधी ओळखून तत्परतेने त्याच्या हातात बॉक्स दिला. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन भाचा चेकाळला. मग आम्ही स्ट्रॉबेरी विकत घेतली.

   "मामा भूक लागली" स्ट्रॉबेरीचा बॉक्स हातात आल्यानं त्याला ताबडतोब भूक लागली होती. मी गाडी थोडीशी पुढं नेऊन एका ढाबा / टपरी वजा हॉटेल समोर उभी केली.
"आत्ता दुसरं काहीतरी खाऊ, स्ट्रॉबेरी तू घरी गेल्यावर खा" मी समजावलं. मग त्याच्या गतीनं आम्ही साधारण पाऊण तासात पटापट खाणं उरकून घेतलं. पुढचा प्रवास सुरु करण्याच्या उद्देशानं आम्ही बाहेर आलो.

        "मामा शु आली" भाच्यानं अजून एक आव्हान दिलं. हॉटेल लहान असल्यानं वॉशरूम वगैरे फालतु लाड नव्हते. काउंटर वरच्या माणसाने शांतपणे हॉटेलच्या मागच्या बाजूकडे बोट दाखवलं. मग आमची जोडी तिकडे गेली.
मागच्या बाजूच्या मोकळ्या जागेत सर्वत्र खुरटी काटेरी झुडपं आणि तण माजलं होतं. काउंटरवरच्या माणसानं आमच्या अगोदर बहुतेक बऱ्याच व्यक्तींना मार्गदर्शन केलं असावं त्यामुळं आसपास दुर्गंधी येत होती, शेजारी एक दोन गंजक्या पत्र्याच्या खोल्या होत्या.
त्यातल्या त्यात एका कडेची थोडी स्वच्छ जागा बघून मी त्याला म्हणालो.
"तू तिकडं जा आणि शु करून झाली कि गाडीत जाऊन मामी जवळ थांब मी पाच मिनिटात येतो."

       तो शहाण्यासारखा मान हलवून निघून गेला, मला बऱ्याच वेळानंतर सिगारेट ओढायची संधी प्राप्त झाली होती. मी सिगारेट पेटवत असताना मला शेजारच्या पत्र्याच्या खोलीतून कसलातरी आवाज आला. मला वाटलं कि हा चुकून तिकडं गेला कि काय.
म्हणून मी थोडंसं पुढं जाऊन आत डोकावून पाहिलं, आणि जे पाहिलं त्यावर माझा विश्वास बसेना.
आत साधारण १२ ते १४ वर्षे वयोगटातील चार पाच कळकट मुलं होती. या खोल्यांमधून कदाचित बाहेर विकल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीचं पॅकिंग केलं जात होतं. जमिनीवर स्ट्रॉबेरीचा ढीग आणि एका बाजूला रिकामी खोकी पडली होती. त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणिव झाली नसावी, मी आत पाहत असतानाच एक मुलगा त्याचे तळहात समोर धरून त्यावर चक्क चार पाचवेळा पचापच थुंकला आणि त्यानं त्याच हातांनी जमिनीवरच्या काही स्ट्रॉबेरी उचलून चोळायला सुरवात केली.

दुसऱ्यानं तेवढेही कष्ट घेतले नाहीत. तो चक्क जमिनीवर पडलेल्या ढिगावरच चिकार थुंकला आणि त्याचंही स्ट्रॉबेरी चोळायचं काम सुरु झालं. मला वांती होणार असं वाटायला लागलं. मी सरळ आत जाऊन एका मुलाचं बखोटं धरून त्याला जाब विचारला.
    तो बिचारा घाबरून गेला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळे तसंच करतात म्हणून तोही करत होता, कारण त्यामुळे फळं ताजी आणि तजेलदार दिसतात असं त्याचं म्हणणं होतं.

       आजूबाजूला असलेली दुर्गंधी, ती गलिच्छ जागा आणि नुकताच पाहिलेला किळसवाणा प्रकार याने मला पोटात ढवळायला लागलं होतं. मला तिथं थांबायचीच इच्छा नव्हती, मी क्षणार्धात तिथून निघालो आणि गाडी सुरु करून आपल्या मार्गाला लागलो. वाटेत मी तो स्ट्रॉबेरीचा बॉक्स भाच्याच्या हातातुन काढून घेऊन त्याच्या रडण्याची पर्वा न करता बाहेर भिरकावून दिला. आणि त्याला नवीन दुसरा, चांगला खाऊ घेऊन देण्याचं वचन दिलं.
      पत्नी माझ्या या वागण्यानं थोडी नाराज झाली होती, पण यामागचं कारण तिला बऱ्याच महिन्यानंतर नंतर समजलं. अजूनही जेव्हा जेव्हा मला स्ट्रॉबेरी दिसते तेव्हा तेव्हा मला या प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ती खायचं तर मी केव्हाच सोडून दिलंय.


  • यह कहानिया जरूर पढ़े 


अंधे / नेत्रहीन लोग कैसे पढ़ते लिखते है ???

मोती कैसे बनता है . मोती की खेती की कहानी

सर आइज़क न्यूटन सर अल्बर्ट आइंस्टाइन की कहानी

गोपाल की कहाणी

कुत्तो के बारेमे कुछ रोचक बाते

भगवान बुद्ध की कहानी

भगवान येशू- की कहानी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर की कहानी

सम्राट अशोक चक्रवर्ती राजा की कहानी

मर्लिन मुनरो की कहानी

यादें खगोल वैज्ञानिकों की -3 स्टीफन हॉकिंग /डॉ अब्दुल कलाम की कहानी

कोयल पंछी अपने अंडे किसी दूसरे पंछी के घोसले में क्यों डालती है???

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ